By  
on  

अभिनेत्री पूजा सावंतने घेतलं नवीन घर ; बेस्ट फ्रेंडने शेयर केला घराचा व्हिडिओ!

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी सिनेसृष्टीतला एक लोकप्रिय चेहरा आहे. तिच्या अभिनयानं आणि उत्तम डान्स स्टाईलने तिने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री पूजा सावंत ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे काही फोटोस् आणि रिल्स व्हिडिओ शेयर करत असते.

पूजाने नुकतंच एक नवीन घर घेतलं असून या नवीन घराची बातमी तिच्या आधी तिच्या खास मित्राने चाहत्यांसोबत शेयर केलीय. हा खास मित्र म्हणजे अभिनेता भूषण प्रधान.. भूषणने पूजाच्या या नवीन घराचा एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेयर करत तिला नवीन घरासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

"पू, तुझ्या नव्या घरासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुला तुझ्या या नव्या घरात नेहमीच आनंद मिळो. घर नेहमी आनंदानं आणि प्रेमानं भरुन जावो. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन सावंत...., असं म्हणत भूषणने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्स करत पूजाला नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान भूषणने शेयर केलेल्या या व्हिडीओत पुजाचा मित्रपरिवार सुद्धा दिसत आहे. व्हिडीओमध्ये पूजा, भूषण, गश्मीर महाजनी, श्रेयस सावंत, गौरी देशमुख हे कलाकार दिसत असून सगळेच पूजाने नवीन घर खरेदी केल्याच्या आनंदात मस्तपैकी धम्माल करताना या व्हिडीओत दिसत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive