By  
on  

रितेश देशमुखचा हा भन्नाट रील पाहिलात का? ; फक्त १ टक्का लोक हे करू शकतात!

अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे फोटोस शेयर करत असतो, त्याचबरोबर त्याचे आणि पत्नी जिनीलिया सोबतचे काही रिल्स व्हिडिओ शेयर करत असतो. चाहत्यांकडून देखील त्यांच्या या रिल्स व्हिडीओला खूप पसंती मिळते. 

 

रितेशचा असाचं एक रील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश गाडीत असल्याचे दिसत आहे. यावेळी हाताच्या अंगठ्याने प्रत्येक बोटाला स्पर्श करून दाखवत आहे. त्याचवेळी तो त्याच्या तर्जणीला करंगळीशी स्पर्श करून दाखवताना दिसतो. रितेशने या व्हिडीओवर "फक्त १% लोकचं हे असं करू शकतात" असं लिहिलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ritesh Deshmukh (@riteishd)

दरम्यान रितेशचा आगामी वेड हा सिनेमा येत असून या सिनेमाचं दिग्दर्शन रितेशने केलं आहे तर जिनीलिया या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive