By  
on  

'देव तारी त्याला कोण मारी' ; आदेश बांदेकर यांनी व्हिडिओ शेयर करत सांगितला गंभीर किस्सा!

झी मराठी वरील 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरघरांत पोचलेले महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर. आदेश भाऊजी सध्या अकरा लाखाच्या पैठिणीच्या मानकरी शोधायला महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दौरे करत फिरत असतात. या दौऱ्यादरम्यान त्यांच्याकडे अनेक आठवणी आहेत. या आठवणींचा उल्लेख करताना त्यांनी झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवरून एक गंभीर किस्सा शेअर केला आहे.

बांदेकर सिन्नरला एका एपिसोडचं शूटिंग करून त्यांच्या टीमसह परत येत असताना तुफान पाऊस सुरु झाला. सिन्नरजवळ एक सुंदर तटबंदी असलेलं दगडी मंदिर होतं. ते पाहून बांदेकर दर्शनाला खाली उतरले. दर्शन घेऊन झाल्यावर परत येऊन गाडीत बसले तर गाडीसमोर एक गाय येऊन आडवी थांबली. "एरवी गाय रस्त्यात येते आणि हॉर्न दिला की पटदिशी पुढे जाते. मात्र ही गाय काही जागची हलेना. असं साधारण बरच वेळ झालं आणि ती दहा-एक मिनिटांनी बाजूला झाली." असं आदेश बांदेकर यांनी त्या व्हिडिओत सांगितलं..

 

नंतर चला आता सिग्नल मिळाला असं गंमतीत बांडेकरांनी म्हटलं आणि ते पुढच्या प्रवासाला लागले. पण इतका तुफान पाऊस सुरु झाला की, पावसामुळे त्यांना पुढचं काही दिसत न्हवतं. त्यामुळे त्यांची गाडी हळूहळू चालली होती. इतक्यात त्यांना समोर एका वृद्ध आजोबांनी हाताने इशारा करत थांबवलं. तिकडे जाऊन प्रकरण काय आहे हे विचारलं तेव्हा कळलं की पुढच्या नदीवरचा पूल पाण्याने ढासळला आणि पडला. त्यांनी आम्हाला पर्यायी मार्गाने जा असं सांगितलं. नशीब बलवत्तर होतं त्यामुळे एका गायीने आमचा जीव वाचवला. असा किस्सा आदेश बांदेकरांनी शेअर केला आहे.

या व्हीडीओखाली अनेकांनी प्रतिक्रिया देत, त्यांना कमेंट्समध्ये असं लिहिलं आहे, "देव पाठीशी आहे तुमच्या. तुमची पुण्याई आणि देवाचा आशीर्वाद याने तुम्ही वाचलात." आणि "तुम्ही आजपर्यंत सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत" अश्या कमेंट्स प्रेक्षकांनी केल्यात.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive