सोनाली कुलकर्णीने केला 'तमाशा', गिरकी चॅलेंज होतंय व्हायरल!

By  
on  

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओंमधून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच सोनालीचं एक गिरकी चॅलेंज प्रचंड व्हायरल होतंय. 

'गिरकी चॅलेंज'  सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. सोनालीनं तिचा एक गिरक्या घेतानाचा व्हिडीओ शेअर करत तिच्या चाहत्यांना गिरक्या घेण्याचं चॅलेंज दिलं आहे.

 

सोनाली कुलकर्णीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिनं रेड कलरची चनिया चोली घातली आहे. सोनालीच्या चेहऱ्याला देखील रंग लागला असून ती घेरदार घागऱ्यासह गिरक्या घेताना दिसत आहे. तर व्हिडीओच्या मागे 'रंग लागला, तुझा छंद लागला' हे गाणं वाजत आहे.  सोनालीनं हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय, 'तुमच्यासाठी हे गिरकी चॅलेंज. रंग लागला या गाण्यावर तुमचा गिरकी चॅलेंजवाला व्हिडीओ शूट करा आणि मला पाठवा'. सोनलीचं चॅलेंज तिच्या चाहत्यांनी स्वीकारुन पटापट व्हिडीओ शेअर देखील केले आहेत.

 

 

हा सर्व तमाशा सोनालीच्या आगामी तमाशा लाईव्ह या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सुरुय. 

 

Recommended

Loading...
Share