“आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?”, हेमांगी कवीची पोस्ट ठरतेय लक्षवेधी

By  
on  

सत्तेच्या सारीपाटासाठी महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं आहे, हे आपण गेले पाच सहा दिवस पाहतोय. सध्या राजकीय धुमशान सुरु आहे. जिथे तिथे फक्त महाराष्ट्राच्या राजकारणाचीच चर्चा रंगलीय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारात आपला एक वेगळा गट निर्माण केला आहे. त्यांच्या समर्थनार्थ तब्बल ४८ आमदार असल्याचं सांगण्यात येत आहे. गुवाहाटी येथे शिवसेनेच्या सर्व बंडखोर शिवसेना आमदारांनी एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत.तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची महाविकास आघाडी कायम ठेवण्याचे प्रयत्न  करतायत.  त्यामुळे राज्यातील राजकारणात भलताच पेच निर्माण झाला आहे. यावर विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री हेमांगी कवी हिने याबाबत एक पोस्ट केलेली पाहायला मिळतेय. 

हेमांगी कवी ही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. हेमांगी ही नेहमी विविध राजकीय मुद्द्यांवर तिचे मत व्यक्त करत असते. नुकतंच राज्यातील राजकारणात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे. हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’, असे हेमांगीने म्हटले आहे.यावरुन हेमांगीला अनेकांनी ट्रोलही केलंय.

 

दरम्यान, हेमांगीने ही पोस्ट तिच्या आगामी तमाशा लाईव्ह या सिनेमासाठी केल्याचं  पुढे स्पष्ट होतंय. तिने या सिनेमातलं अभिनेता सचित पाटीलवर चित्रित झालेल्या वाग आला गाण्याचा व्हिडीओसुध्दा शेयर केलाय. 

Recommended

Loading...
Share