By  
on  

"कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे" म्हणत शरद पोंक्षेंनी 'तो' फोटो केला शेयर!

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय उलाढालींबद्दल प्रत्येक जण आपापली मतं मांडत आहेत. सामान्यातल्या सामन्य माणसापासून ते अगदी मोठमोठ्या सेलेब्रिटीस् पर्यंत सगळेच यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

याच दरम्यान अभिनेते शरद पोंक्षे यांच्या एका पोस्टची तुफान चर्चा रंगली आहे. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. वेगवेगळ्या घडामोडींवरील तसेच विषयांवरील आपली मतं ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. पोंक्षे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानत सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

शरद पोंक्षे यांनी पोस्ट केलेल्या फोटोवर "हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वतःची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं... सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले" असं लिहिलं आहे, तर हाच फोटो शेयर करताना खाली कॅप्शनमध्ये शरद पोंक्षे यांनी "कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात" असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

खरंतर शरद पोंक्षे यांच्या 'दुसरं वादळ' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीबद्दलची आहे पण पोस्टमधील एकनाथ शिंदे यांच्या उल्लेखामुळे याला वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात आहेत. दरम्यान शरद पोंक्षे यांच्या या पोस्टखाली नेटकर्यांनी "या पोस्टमध्ये एक राजकीय अर्थ दडलाय" , "तुम्हाला मदत करणारा माणूस कृतघ्न झाला" अश्या काही कमेंट्स केल्या आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive