मराठमोळ्या अमृता सुभाषच्या 'सास बहू अचार प्राइव्हेट लिमिटेड'चा ट्रेलर पाहिलात का?

By  
on  

महिला दिनानिमित्त ZEE5 आणि TVF यांनी त्यांची पहिली वेबसिरीज 'सास बहू अचार प्रायव्हेट लिमिटेड'ची घोषणा केली होती. आता या बहुप्रतिक्षित वेबसिरीजचा ट्रेलर समोर आला आहे. अरुणाभ कुमार आणि अपूर्व सिंग कार्की यांनी या वेबसिरीजची निर्मिती केली आहे, तर अपूर्व सिंग कार्की यांनी ही वेबसिरीज दिग्दर्शित केली आहे. तसेच अभिषेक श्रीवास्तव आणि स्वर्णदीप बिस्वास यांनी ही वेबसिरीज लिहिली आहे. ६ भागांची वेबसिरीज ८ जुलै रोजी ZEE5 वर प्रदर्शित होईल. या वेबसिरीजमध्ये यामिनी दास, अनुप सोनी, अंजना सुखानी आणि आनंदेश्वर द्विवेदी यांच्यासह राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अमृता सुभाषची प्रमुख भूमिका आहे. अमृताभोवतीच या सिरीजचं कथानक गुंफण्यात आलंय. ही मालिका हिंदीमध्ये उपलब्ध असेल.

'सास बहू अचार प्रायव्हेट लिमिटेड' मधली सुमन जुन्या दिल्लीतील चांदनी चौकातील ऐतिहासिक गल्ल्यांभोवती फिरते, जी लोणच्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अथक संघर्ष करते आणि तिचा नवरा, दिलीपकडून आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी संघर्ष करते आणि तिच्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात करते. या वेबसिरीजमध्ये सुमनच्या भूमिकेत अमृता सुभाष, दिलीपच्या भूमिकेत अनुप सोनी आणि सुमनच्या सासूच्या भूमिकेत यामिनी दास दिसणार आहेत. जी तिची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे. 'सास बहू अचार प्रायव्हेट लिमिटेड' मध्ये, सुमन आजच्या मुलींची कहाणी चित्रित करण्याचा प्रयत्न करते, ज्या घटस्फोट घेतल्यानंतर, व्यवसायाच्या जगात प्रवेश करतात आणि स्वतःचा ठसा उमटवतात.

ट्रेलरमध्ये पाहिल्याप्रमाणे, 'सास बहू अचार प्रायव्हेट लिमिटेड' ही आजच्या सुमनची कहाणी आहे जिथे ती तिच्या सासूच्या (यामिनी दासने भूमिका केली आहे) पाठिंब्याने व्यवसायाच्या जगात ठसा उमटवते आणि अशा प्रकारे ती आयुष्यात पुढे जाते. तथापि, आर्थिक स्वावलंबन मिळवून आणि तिची मुले परत मिळवून, ती यशस्वी उद्योजक होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करू शकेल का? हे या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळेल.

 

याबाबत अमृता सुभाष म्हणाल्या, "सास बहू अचार प्रायव्हेट लिमिटेड' मधील भूमिका ही विशेष आणि वेगळी आहे. कारण सुमनची व्यक्तिरेखा मी याआधी साकारलेल्या कोणत्याही पात्रापेक्षा वेगळी आहे. तिच्यात प्रतिकूल परिस्थितीतही ठसा उमटवण्याची ताकद आहे. तिचा संघर्ष दुःखद नाही तर आकर्षक आहे आणि तिचा प्रवास इतरांना चिकाटीने आणि त्यांची स्वप्ने न सोडण्याची प्रेरणा देईल. या प्रवासात तिला सतत पुढे नेण्याचे बळ देते ते म्हणजे तिचे कुटुंब. मला या वेबसिरीजमध्ये एका खंबीर स्त्रीची भूमिका साकारायला मिळाली यासाठी मी खूप आनंदी आहे."

Recommended

Loading...
Share