By  
on  

"मुख्यमंत्री म्हणून अलविदा म्हणताना खरंच वाईट वाटतंय" ; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्या नंतर हेमंत ढोमे झाला भावूक!

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक मंत्र्यांच्या बंडातंर गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर अनेक स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. सलग दहा दिवस सुरु असलेलं हे राजकीय नाट्य मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संपलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवार २९ जून रोजी फेसबुक लाईव्ह मार्फ़त जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर याबाबत सोशल मीडियाद्वारे लोकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. फक्त सामान्य लोक नव्हे तर कलाकार मंडळी देखील आपलं मत मांडताना दिसत आहेत.

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता हेमंत ढोमे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याची अनेक राजकीय मतं तो सोशल मीडियावर वक्त करत असतो. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याबाबत हेमंतने एक भावनिक ट्विट केलं आहे. 

"धन्यवाद उद्धव ठाकरे. तुमचा संपुर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता. करोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणून आमची काळजी घेतली. आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणून अलविदा म्हणताना खरंच वाईट वाटतंय. धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार…" अशा प्रकारचं ट्विट हेमंतने दुःख व्यक्त केले त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे आभार देखील मानले आहेत.

त्याच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी देखील 'लव्ह यु उद्धवजी ठाकरे साहेब', 'उद्धव ठाकरे पुन्हा भरारी घेतील यात शंका नाही. साहेब खूप प्रेम' अश्याप्रकारच्या भावनिक कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive