By  
on  

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर काय म्हणाले दिग्दर्शक केदार शिंदे, पाहा ही पोस्ट!

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामान्यानंतर अनेक कलाकार आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतात. ते नेहमी विविध मुद्यांवर त्यांचे मत व्यक्त करत असतात. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर केदार शिंदे यांनी नुकतंच एक मार्मिक पोस्ट शेअर केली आहे.

"तिसरी घंटा झाली.. पडदा सरकला.. नाटक सुरू.. performance तोच!!!!", असे केदार शिंदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान केदार शिंदेंच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबद्दल विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive