By  
on  

“धन्यवाद उद्धवजी…”, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर उर्मिला मातोंडकरची पोस्ट चर्चेत

गेले अनेक दिवस चालेलं सत्ता स्थापनेचं नाट्यावर अखेरे काल मंगळवारी पडदा पडला. महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप झाला. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. शिवसेनेतील 40 आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड पुकारल्याने शिवेसेना विरुध्द शिवसेना असे गट राज्याच्या जनतेने पाहिले. हा एक ऐतिहासिक बंड होता. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला.  उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हवरुन राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. नुकतंच प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

उर्मिला मातोंडकर या नेहमी विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतात. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी एक ट्विट केले आहे. धन्यवाद उद्धव ठाकरेजी. तुमच्या नेतृत्वामुळे आपले राज्य कोविडसारख्या कठीण काळातही जातीयवाद आणि द्वेषापासून दूर राहिले. तुमचे नेतृत्व अनुकरणीय, पूराग्रहरहित, धाडसी, प्रतिक्रियात्मक,पारदर्शी, संवादप्रिय होते. जय महाराष्ट्र ! असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले.

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive