By  
on  

"मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्रींना समान वागणूक मिळत नाही.." सई ताम्हणकरने स्पष्टपणे मांडलं मत

मराठीसह हिंदीत देखील आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. नाटक,मालिका, सिनेमा आणि वेबसिरीज मध्ये काम करत तिने आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

मराठीतली बोल्ड अँड बिनधास्त म्हणून ओळखली जाणारी सई तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीचं चर्चेत राहिली आहे. सईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीबाबत काही खुलासे केले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रींना मिळणाऱ्या वागणुकीविषयी अभिनेत्रींचा मानधनाबद्दल सई तिचं स्पष्ट मत मांडताना म्हणाली, "मी मराठी चित्रपटसृष्टीमधून आहे. मला इतर चित्रपटसृष्टीबाबत माहित नाही. पण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रींना समान वागणूक मिळत नाही. आजही अभिनेत्यांच्या तुलनेमध्ये मराठी अभिनेत्रींना कमी मानधन मिळतं."

याबद्दल पुढे सई म्हणाली, "एखाद्या भूमिकेसाठी अभिनेत्री देखील तितकीच मेहनत घेते जितकी एखादा अभिनेता मेहनत करत असेल. मी या मुद्द्यावर पुन्हा माझं मत मांडण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरुन निर्माण झालेल्या या परिस्थितीमध्ये काही सुधारणा होईल. मराठी चित्रपटसृष्टीमधील सगळ्या अभिनेत्री एकत्र आल्या तर याविरुद्ध लढणं सोपं होईल आणि त्यातून काहीतरी मार्ग निघेल. पण एकच अभिनेत्री जर बोलत असेल तर त्याचा निर्माते-दिग्दर्शकांवर कोणताच परिणाम होत नाही. कारण इतर अभिनेत्री मिळेल त्या मानधनामध्ये काम करतात."

अश्याप्रकारे मराठी सिनेसृष्टीतील सर्व अभिनेत्री एकत्र आल्या तर यावर काहीतरी मार्ग निघू शकतो. पण सध्या याबाबत मी एकटीच बोलत असून मी याबद्दल नेहमीच प्रयत्न करेन. त्याचबरोबर अभिनेत्रींना देखील चित्रपटसृष्टीमध्ये समान वागणूक मिळण्याविषयी सईने तिचं मत स्पष्टपणे मांडलं.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive