By  
on  

"मेट्रो ३ चे कारशेड 'आरे'तच होणार.." म्हणत अभिनेता सुमित राघवनचा शिंदे सरकारच्या निर्णयाला पाठिंबा

महाराष्ट्रात खूप मोठ्या राजकीय घडामोडींनंतर शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले. पण या राजकीय वादानंतर आता 'आरे'चा वाद सुरू झाला आहे. काही वर्षांपूर्वी पर्यावरण प्रेमींच्या अंदोलनानंतर आरे येथे होणाऱ्या करशेडला स्थगिती दिली होती. परंतु आता फडणवीस आणि शिंदे यांचे सरकार येताच त्यांनी पुन्हा आरे येथेच कारशेड होणार असल्याचे जाहीर केले. म्हणून पुन्हा एकदा 'आरे बचाव' च्या घोषणा केल्या जात आहेत. अशातच अभिनेता सुमीत राघवनने मात्र 'आरे' येथे कारशेड करण्याला पाठिंबा दर्शवला देत यासंदर्भात त्याने एक ट्विट देखील केले आहे. दरम्यान नवीन सरकारच्या या भूमिकेला अनेक पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवत सरकारच्या या निर्णयाशी ते असहमत आहेत. तसेच अनेक कलाकारांकडून देखील अनेक कलाकारांकडून देखील आरे वाचवण्यासाठी पाठिंबा दिला जात आहे. पण अभिनेता सुमीत राघवन याने विरोधी भूमिका घेतली आहे. 

 

दरम्यान या निर्णयाला पाठिंबा देत त्याने 'कारशेड आरेतच होणार' असे ट्विट त्याने केले आहे. कुर्ल्यातील एका संस्थेचे पोस्टर शेयर करत सुमीत ट्विट मध्ये म्हणतो, 'एक वेगळा voice ऐका. मी स्वतः नेहरू नगर, कुर्ला (पू) चा आहे आणि माझी आणि माझ्या बरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की, हा वाद आता पुरे. आम्हाला मुंबई मेट्रो ३ ही लवकरात लवकर सुरू व्हायला हवी आहे. राहिला मुद्दा कारशेडचा, तर #CarShedWahiBanega म्हणजे कुठे? तर #आरे मध्येच.' असे ट्विट करत त्याने आरे कारशेडला पाठिंबा दर्शवला आहे. 

शिवाय त्याने 'देवेंद्रजी आणि शिंदे साहेब मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की आता ह्याच्यावर एकदाचा पडदा पाडा. हे नाटक दर दोन वर्षांनी सुरू राहिलं तर अर्थ नाही. जे मुंबईकर माझ्या मताशी सहमत आहेत त्यांनी आता आवाज करणं गरजेचं आहे. एक प्रोजेक्ट धड होऊ नये? पैसा,जीव,वेळ.. काही किंमत आहे की नाही?' असे देखील या ट्विट मध्ये सुमितने म्हटले आहे. दरम्यान त्याच्या या ट्विट खाली काही नेटकर्यांनी आरे कारशेडला पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत, तर काहींनी या कारशेडला विरोध दर्शवणारे कमेंट्स केल्या आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive