By  
on  

Photos : गोड परीची कुठली पोझ तुम्हाला जास्त आवडली?

 'माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात. 

 परीनं म्हणजेच मायरानं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. ते फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

पिवळा परकर आणि गुलाबी पोलका या क्यूट ड्रेसमधला मायराचा हा लुक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय, 

फोटोंमध्ये परी वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

'तुम्हाला कुठली पोझ आवडली?', असं म्हणत परीनं तिचे क्यूट फोटो शेअर केलेत.

मायराच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive