'तुझ्या माझ्या संसाराला' फेम अमृता पवारची लगीनघाई ; चेहऱ्यावर आलं हळदीचं तेज!

By  
on  

झी मराठी वरील 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मधील अदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार हिचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. 'Bride to be' असे म्हणत अमृताने आपल्या लवकरच होणाऱ्या लग्नसोहळ्याची बातमी जाहीर केली. 

अमृताची लग्नघटिका जवळ आली असून नुकताच तिचा हळद समारंभ दणक्यात साजरा झाला. अमृताचा हळदी समारंभाचा स्पेशल लूक खूपच छान दिसत होता.  हळदीसाठी अमृतानं खास गडद पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. त्याचबरोबर अमृताच्या 'दुल्हनिया' असं लिहिलेल्या आकर्षक कानातल्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. 

 

अमृताचे जवळचे सगळे मित्र मैत्रिणी हळदीला आले होते. अभिनेता शुभंकर तावडे आणि टेलिव्हिजनवरील अनेक कलाकारांनी अमृताच्या हळदीला धम्माल केली.अमृताने तिच्या हळदी समारंभाचे काही खास क्षण तिच्या सोशल मीडियावरून शेयर केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amruta Pawar (@pawaramruta)

दरम्यान ४ जुलै रोजी हळदी समारंभ उत्साहात पार पडल्यानंतर येत्या ६ जुलैला अमृता आणि निल विवाहबंधनात अडकणार आहेत. अमृता पवार ही अभिनेत्री आहे तर तिचा होणारा नवरा निल पाटील हा बायोमेडिकल इंजिनिअर आहे.

Recommended

Loading...
Share