'ती परत आलीये' फेम अभिनेत्री कुंजिका रंगली वारीच्या रंगात

By  
on  

स्वामिनी मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री कुंजिका काळवीट. कुंजिकाने तिच्या गोड दिसण्यासोबतच सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. 

कुंजिका काळवीट नुकतीच गिरगावच्या वारीत सहभागी झाली होती. कुंजिका ही मुळची गिरगावातील असल्यानं तिच्यासाठी ही वारी फारच जवळची आणि महत्त्वाची आहे.

अभिनेत्री कुंजिकानं यावेळी फार साध्या लुकमध्ये गिरगावच्या वारीत सहभागी झाली होती. यावेळी कुंजिका मोठ्या उत्साहात वारीत भजन आणि ओव्या गाताना दिसली.


याआधी ती गिरगावच्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सुद्धा सहभागी झाली होती. त्यावेळी तिने तिचे पारंपरिक लूकमधले फोटोस सोशल मीडियावर शेयर केले होते.

तिच्या पारंपरिक लुकमधील फोटोसला खूप पसंती मिळाली होती आणि आताच्या साध्या लूकमधील फोटोंना देखील चाहत्यांकडून पसंती मिळत आहे

'स्वामीनी' या मालिकेशिवाय कुंजिका 'चंद्र आहे साक्षीला', 'ती परत आलीय' सारख्या मालिकांमधून तिने प्रेक्षककांचे मनोरंजक केलं आहे.

Recommended

Loading...
Share