By  
on  

"मला तुझ्याकडून काहीच नको" ; अभिनेते भरत जाधव यांची विठुरायासाठी भावनिक पोस्ट

मराठीतील सुपरस्टार अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. भारत जाधव यांनी आपल्या अभिनय कौशल्याने तसेच विनोदी कौशल्याने रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. रंगभूमी पासून तर चित्रपटांपर्यंत भारत जाधव यांनी अनेक क्षेत्रांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठ्लाच्या भक्तीत बुडाला आहे. सामान्य व्यक्तींपासून तर अगदी कलाकारांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. पंढरपुरात लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत. यात अभिनेता भरत जाधवने पांडुरंगाला भावनिक साद घालत एक पोस्ट शेअर केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

भरत जाधव यांनी इन्स्टाग्राम एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की,  "मला तुझ्याकडून काहीच नको… मला तू दिलेले चिरंतन देणे वेगळेच आहे..!! नको तुझे ज्ञान नको तुझा मान ।
माझे आहे मन वेगळेंची ।।१।।
नको तुझी भुकटी नको तुझी मुक्ती ।
मज आहे विश्रांती वेगळीच ।।२।। चरणी ठेउनी माथा विनवितो सावता । एका पंढरीनाथा विज्ञापना ।।३।।

दरम्यान भरत जाधव यांनी हा अभंगाबरोबर त्यांचं सुंदर रेखाचित्रही शेअर केलं आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत भरतनं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. भरत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो आणि चाहत्यांशी संवादही साधत असतो.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive