By  
on  

"पिल्लू निघालं वैमानिक व्हायला" ; अभिनेते शरद पोंक्षे यांची लेकीसाठी भावनिक पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे हे आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेते म्हणून ओळखले जातात. शरद पोंक्षे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अभिनेते शरद पोंक्षे यांची लेक आता वैमानिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाली आहे. याबद्दलची एक खास पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेयर केली आहे.

शरद पोंक्षे यांना स्नेह आणि सिद्धी अशी दोन मुलं आहेत. त्यापैकी सिद्धी ही वैमानिक होण्यासाठी परदेशात गेली आहे. शरद पोंक्षेनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये शरद पोंक्षे यांनी आपल्या लाडक्या लेकीला निरोप देताना म्हटले आहे की, ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला.’ त्यांचा हा फोटो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे.

दरम्यान शरद पोंक्षे यांनी आपल्या लेकीबद्दलची अभिमानास्पद पोस्ट सोशल मीडियावर शेयर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पोंक्षे त्यांच्या काही वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या ते ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive