By  
on  

स्वप्नील जोशीला इटालियन खाणारी चिनी मुलगी भेटते तेव्हा..

मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार स्वप्निल जोशी हा सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतो. चाहत्यांशी संपर्क साधायला त्याला नेहमीच आवडतं. टी.व्ही, सिनेमा , हिंदी मनोरंजनविश्व अशा सर्वच ठिकाणी स्वप्निलच्या अभिनयाची जादू अनुभवायला मिळते. सध्या स्वप्निल जोशीची तू तेव्हा तशी ही मालिका प्रचंड गाजतेय. या मालिकेतील त्याची अनोखी प्यारवाली लव्हस्टोरी प्रेक्षकांना खुप भावतेय. स्वप्निल त्याच्या इन्स्टाग्रामवर सतत काही ना काही पोस्ट करत असतो. नुकतंच  त्याने एक हटके पोस्ट शेयर करत चाहत्यांना बुचकळ्यात टाकलंय. 

. स्वप्नील जोशीला एक इटालियन खाणारी मुलगी भेटली आहे. तिचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही मुलगी त्याच्यासाठी नक्कीच कोणीतरी खास दिसत आहे. कोण असेल ही मुलगी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?

ही इटालियन खाणारी मुलगी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित आहे. स्वप्नीलने तेजस्विनी पंडितचा फोटो 'इटालियन खाणारी चिनी मुलगी' असं म्हणत सोशल मीडियावर शेअर केला आहे. खरंतर स्वप्नील जोशीने शेअर केलेल्या या फोटोमुळे दोघंही पुन्हा एकत्र झळकणार का याची उत्सुकता आहे. 

स्वप्निल तेजस्विनी जोडीचा तू ही रे सिनेमा खुप लोकप्रिय ठरला होता. तर मागच्या वर्षीच त्यांच्या गाजलेल्या समांतर या वेबसिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित झालाय 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive