By  
on  

आयपीएस विश्वास नांगरे-पाटील आणि अभिनेता आर. माधवन होते रुम पार्टनर, वाचा त्यांच्या मैत्रीचा किस्सा !

एका मराठी वृत्तवाहिनीच्या 'माझा कट्टया' या कार्यक्रमात नुकताच अभिनेता आर. माधवनने हजेरी लावली होती. यावेळी त्याने पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या कॉलेजमधील खास आठवणींना उजाळा दिला.

अभिनेता आर. मधवनने कोल्हापूरमधील राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. या कॉलेजमध्ये तो शिक्षक असताना त्याच्यासोबत पोलीस अधीक्षक नांगरे पाटील देखील होते. त्या दोघांची त्या काळापासून मैत्री आहे आणि त्यावेळी त्यांच्यात स्पर्धा असायची. त्यांचा हा मैत्रीचा खास किस्सा आर माधवनने या मुलाखतीत सांगितला

दरम्यान आर माधवनचा हा व्हिडिओ विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या फेसबुकवर शेयर करत त्याखाली एक पोस्ट देखील लिहिली आहे.
विश्वास नांगरे पाटील म्हणतात, "तुमच्या या शब्दांसाठी खूप खुप धन्यवाद, तुमचे हे शब्द मला खूप शक्ती देतात. तुमचं रॉकेटरी या सिनेमामधलं काम खुप छान आहे. त्याचबरोबर तुम्ही आमचे सुपरस्टार आहात, याचा आम्हाला अभिमान आहे."

पुढे त्यांनी आर माधवन हा त्यांचा रुममेट असल्याच्या काही आठवणी सांगताना म्हटले आहे की, "आर. माधवन हा फक्त इंग्रजी बोलायचा आणि पूर्ण रूममध्ये त्याचं पुस्तके आणि व्यायामाचं सामान पडलेलं असायचं. त्यानंतर अगदी कमी दिवसांत तो माझा मित्र झाला."

पुढे ते म्हणतात, "आम्ही दोघे एकत्र सायकलवर कॉलेजमध्ये जाताना मी त्याला इंग्रजी बोलायला सांगायचो जेणेकरून माझ्या इंग्रजीमध्ये सुधारणा व्हावी. आर. माधवनच्या गोड स्वभावामुळे तो कायम शिक्षकांचा लाडका राहिला. विश्वास नांगरे पाटील यांच्या मन में है विश्वास या पुस्तकात नांगरे पाटील यांनी मॅडी अर्थात आर माधवन यांच्यासोबतच्या मैत्रीचे वर्णन केलं आहे. 

दरम्यान आर माधवनने 'रेहना है तेरे दिल मैं', 'थ्री इडियट्स', 'तनू वेड्स मनू' यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं आहे. आर माधवन 'रॉकेट्री' या चित्रपटामध्य नाम्बी नारायण यांची भूमिका साकारली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive