By  
on  

पूजा आणि सिद्धार्थ करतायत congratulations ; प्रथमच एकत्र दिसणार ही जोडी

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटोस् आणि रील व्हिडीओ शेयर करत तो चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहतो

अभिनेत्री पूजा सावंत सोबत सोबत एक क्युट फोटो शेयर केला आहे. यावरून लवकरचं हे दोघे लवकरच एका सिनेमात एकत्र झळकणार असल्याचे दिसून येतंय.

पूजा आणि सिद्धार्थच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'काँग्रॅच्युलेशन्स' असं आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल देखील दिसणार आहेत.

प्रसिद्ध मराठमोळे दिग्दर्शक लोकेश विजय गुप्ते यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. नुकतंच पूजा सावंत आणि लोकेश गुप्ते यांनी 'माय डॅडस वेडिंग' हा सिनेमा एकत्र केला आहे.

यानंतर पूजा सावंत लगेच तिच्या दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगच्या तयारीला लागली आहे. या सिनेमाचं शूटिंग हे लंडनमध्ये सुरू आहे. 

दरम्यान सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावंत ही फ्रेश जोडी एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत. त्याचबरोबर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे यासाठी सर्वचजण वाट पाहत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive