By  
on  

"हळूहळू कामाला लागूया नाहीतर...." अभिनेते प्रशांत दामलेंची 'ती' पोस्ट चर्चेत

मराठी नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या घरघरांत पोचलेले अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. प्रशांत दामले यांनी त्यांच्या विनोदीबुद्धीने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी डान्स, सिंगिंग आणि अनेक कुकरी शोजचे परीक्षण देखील केलं आहे. व्यस्त कामातून वेळ काढत त्यांनी बऱ्याच वर्षांनी त्यांच्या कुटुंबासोबत एन्जॉयमेंट केली. त्यानंतर आता त्यांनी एक पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा कामाचा श्रीगणेशा करत असल्याचे सांगितले आहे.

प्रशांत दामले हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकतीच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर करत "चला आता हळू हळू कामाला लागूया नाहीतर अंगात आळस भरेल… सुट्टी संपत आली.. आपल्या आवडत्या कामाची आणि नाटकाची वेळ आली. कितीही वेळा बघा कुठूनही बघा आनंद तोच आजच तिकीट बुक करा. शिवाजी मंदिरला जवळ जवळ 3 वर्षांनी प्रयोग आहे आणि बोरिवलीला सुद्धा खुप महिन्यांनी. या आणि चार्ज व्हा..”, असे कॅप्शन प्रशांत दामले यांनी दिले आहे. त्याचबरोबर या पोस्टमध्ये प्रेक्षकांना हे नाटक बघण्याचे आवाहनदेखील केले आहे.

दरम्यान मराठी रंगभूमीवरील त्यांच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाचे ५०० भाग पूर्ण झाले. या नाटकात प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी पाहायला मिळत आहे. या नाटकाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. त्यासोबतच ते झी मराठीवरील किचन कल्लाकार या शो मध्येही दिसले होते

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive