सैराट फेम सल्याला पुण्यातील रिक्षावाल्यांकडून त्रास ; फेसबुक पोस्ट शेयर करत व्यक्त केला संताप

By  
on  

सैराट मधील सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेखला पुण्यातील रिक्षाचालकांनी त्रास दिल्याची बातमी समोर आली असून स्वतः अरबाजने यासंबंधीची एक पोस्ट त्याच्या फेसबुकवरून शेयर केली आहे. रिक्षाचालक मीटरप्रमाणे येण्यास नकार देत मनमानी भाडे आकारत आहेत. रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. हे सर्व प्रकार थांबावेत यासाठी अरबाजने फेसबुक पोस्ट केली आहे. 

अरबाजने लिहिले आहे, पुण्यात रिक्षावाल्यांकडून लूट.. सगळेच रिक्षावाले असे असतील असे नाही. नांदेड सिटी ते पुणे स्टेशनला यायला 198 रुपये होतात. मी कधीच ओला, उबेर, रॅपिडो सारख्या अॅपचा वापर करत नाही. पाऊस असल्याने मित्राला सोडण्यासाठीदेखील नकार दिला. त्यामुळे मित्राने मला रॅपिडोवरून रिक्षा करून दिली. पाऊस चालू होता. नांदेड सिटीमधून रिक्षा निघाली. त्याने मला खूप फिरवले. मी त्याला म्हटलं दादा तू खूप फिरवतो आहेस. त्यावर त्याने काहीही उत्तर दिलं नाही". यापुढे अरबाज म्हणतो, "प्रवासादरम्यान 60 रुपये जास्तीचे मागायला त्याने सुरुवात केली. मी का असा प्रश्न उपस्थित केल्यावर त्या रिक्षाचालक मला शिवी देत म्हणाला, पाऊस सुरू आहे. तू इथेच उतर. जास्त बोलू नको. मी रोज रिक्षा चालवतो...तू नाही. तुला 60 रुपये जास्तीचे द्यावे लागतील. नाहीतर इथेच उतर."

दरम्यान "माझ्यासारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसाला जर अशा प्रसंगांचा सामना करावा लागत असेल तर गावावरून/फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येत असतील त्यांचे काय हाल होत असतील... त्यांची हे लोक किती लूट करत असतील. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अपेक्षा करतो की, यंत्रणा यावर मार्ग काढेल." असं म्हणत या पोस्टद्वारे त्याने अश्या प्रकारांना आळा बसावा म्हणून व्यवस्था आणि यंत्रणेला याकडे लक्ष देण्याचे आवाहन देखील केले आहे.

Recommended

Loading...
Share