By  
on  

'अलका ताई तुस्सी ग्रेट हो' म्हणत दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांनी शेयर केला अलका कुबल यांचा व्हिडिओ

आपल्या दमदार अभिनयाने नव्वदीच्या काळापासून अगदी आतापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. अलका कुबल यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामुळे अजूनही कलाविश्वात त्यांच्या नावाचा दबदबा आहे. सोनी मराठी वरील आई माझी काळूबाई या मालिकेतून त्या छोट्या पडद्यावर झळकल्या.

त्यानंतर आता अलका कुबल पुन्हा चित्रपटांकडे वळल्या आहेत. लोकेश गुप्ते दिग्दर्शित CONGRATULATIONS या आगामी चित्रपटात अलका कुबल झळकणार आहेत.

या चित्रपटात त्यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावंत स्क्रीन शेअर करणार आहेत अनन्या सिनेमाच्या निमित्ताने सगळेजण लंडनमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत आहेत.

दरम्यान शूटिंगच्या व्यस्ततेतून वेळ काढत अलका कुबल यांनी सर्वांसाठी खास जेवण केल्याचा व्हिडिओ दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे. हा व्हिडिओ शेयर करत त्यांनी खाली कॅप्शनमध्ये म्हटलंय की, "काल शूटिंग थोडे लवकर संपल्यावर एखादिनी आराम केला असता रूमवर जाऊन..
पण छे... मार्केटमध्ये जाऊन कोळंबी आणून ती रूमवर साफ करून आज सगळ्यांना स्वतःच्या हातचे कालवण खाऊ घातले...
"अलका ताई तुस्सी great हो " असं म्हणत त्यांनी दीड महिन्यांनी घरचे जेवण जेवल्याचे समाधान मिळाले" असं म्हटलं आहे.

दरम्यान या व्हिडीओखाली चाहत्यांसोबत मराठीतील अनेक कलाकारांनी देखील 'वाह', 'छान', 'मस्त' अश्या अनेक कमेंट्स केल्या आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive