By  
on  

दोस्ती, पार्टी, प्रेम, राडा आणि एंटरटेनमेंटचा फुल्ल पॅकेज असलेला 'टकाटक २'चा मोशन पोस्टर पाहिलंत का?

२०१९ मध्ये आलेल्या 'टकाटक' या सिनेमातील बोल्ड सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘टकाटक’ला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सोशल मीडियाद्वारे चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. यानिमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाचा डबल डोस अनुभवायला मिळेल.

टकाटक २ च्या या मोशन पोस्टर मध्ये अभिनेता प्रथमेश परब व्यतिरिक्त आणखी काही नव्या कलाकारांची सुद्धा चित्रपटामध्ये एण्ट्री झाली आहे. अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर हे कलाकार या चित्रपटात काम करताना दिसतील तर या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं आहे.

चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये दिसणाऱ्या महाविद्यालयावरून हा सिनेमा महाविद्यालयातील तरुण मुला-मुलींची धमाल-मस्ती यामध्ये पाहायला मिळेल असं दिसतंय. हा चित्रपट येत्या १८ ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. शिवाय ‘टकाटक २’ मध्ये काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान टकाटक सिनेमातून दिग्दर्शकाने कथानकाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश समाजापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे टकाटक २ हा देखील अश्याच धाटणीचा चित्रपट असावा असं म्हटलं जात आहे. 

दरम्यान टकाटक २ चं मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर अल्पावधीतच या पोस्टरनं लक्षवेधी लाईक्स मिळवले असून, प्रेक्षकांची पसंती मिळवत बाजी मारल्याचं चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळेच एकूणचं टकाटक २’ मध्ये काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive