बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. आता देखील ती एका कारणामुळे चर्चेत आलीय आणि ते कारण म्हणजे तिचा आगामी सिनेमा इमर्जन्सी. कंगनाच्या या सिनेमातील लूकने तिच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत
कंगणाचा आगामी चित्रपट इमर्जन्सी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमात कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची फर्स्ट लूक समोर आला आहे. 'इमर्जन्सी'चा टीझर रिलीज झाला असून त्याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
कंगना राणावतने इमर्जन्सी सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करत 'Presenting ‘Her’who was called ‘Sir’ असं कॅप्शन लिहिलं आहे. यात कंगना डायलॉग म्हणताना दिसते आहे की, 'अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगा की माझ्या कार्यालयात मला सर्वजण मॅडम नाही, सर म्हणून हाक मारतात.' त्यानंतर आणीबाणी जाहीर झाल्याचे सांगणारी एक बातमी वाचल्याचा आवाज ऐकू येतो. यावरून आणीबाणीच्या काळातील एकंदरीत परिस्थिती चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
दरम्यान तिने या व्हिडिओखाली टॅग केलेल्या अनेक कलाकारांमध्ये मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेचा देखील समावेश आहे. त्यामुळे तो देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. पण त्याची भूमिका काय असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.