By  
on  

अभिनेत्री-गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची आत्महत्या

प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या भावाशी संबंधित एक बातमी समोर येत आहे. केतकी माटेगावकरच्या भावाने पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर येत आहे. नोकरी मिळत नसल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजत आहे. अक्षय माटेगावकर असं त्याचं नाव असून तो केतकीचा चुलत भाऊ असल्याचं कळतंय. अक्षयने माटेगावकरने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी हे पाऊल उचलल्याचं समजत आहे. तसंच अक्षयने मृत्यूआधी एक सुसाईड नोट लिहिल्याचं सुद्धा समोर आलं आहे.

अक्षयने लिहलेल्या सुसाईड नोट मध्ये त्याने असं म्हटलंय की, "ही शेवटची गोष्ट असेल जी मी लिहीत आहे. आई, बाबा, आकांक्षा मला माफ करा. तुमच्या अपेक्षा पूर्ण न करण्यासाठी मी माफी मागतो. मी खूप प्रयत्न केले, पण मला जमलं नाही. माझ्या इन्टर्नशिपमध्ये मी चांगली कामगिरी केली नाही आणि त्यामुळे मला माहित आहे की मला चांगली नोकरी मिळणार नाही. हे सगळं तुम्हाला सांगायची माझ्यात हिंमत नाही आणि याशिवाय माझ्याकडे कोणता पर्याय नाही. आई, बाबा, आकांशा मला माफ करा. तुमचा अक्षय माटेगावकर." या शब्दांत अक्षयने त्याच्या भावना व्यक्त करत त्याचं जीवन संपवलं.

इंजिनिअरिंग झालेल्या अक्षयने ‘प्लेसमेंट’ मिळणार नाही, या भीतीने आत्महत्या केली असून ही घटना सुसगाव येथे शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. अक्षयने कम्प्युटर इजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून त्याने नोकरीसाठी ‘प्लेसमेंट’ मिळणार नाही, या भीतीने सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान त्याच्या या कृत्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive