अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर अभिनय क्षेत्र सोडून या क्षेत्रात आहे कार्यरत

By  
on  

‘फु बाई फु’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘मोलकरीणबाई’, ‘श्रीमंताघरची सून’ , ‘बाळकडू’ अश्या अनेक चित्रपट आणि कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. सध्या त्या स्टार प्रवाह वरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत माईंची भूमिका साकारत आहेत. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना फार आवडत

दरम्यान त्यांच्या कुटुंबियांबद्दल फारशी काही माहिती नाही. पण त्यांची धाकटी बहीण अर्चना नेवरेकर मराठी चित्रपट सृष्टीत चांगल्या स्थिरस्थावर आहेत. दोघी बहिणींनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची ओळख बनवली आहे. मात्र सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे याने अभिनय क्षेत्रात येण्यापेक्षा आपल्या आवडत्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला.

मिहीर हा शेफ आहे. संजीव कपूर यांच्या खाना खजाना या शोमध्ये त्याने सहभाग घेतला होता. काही काळ तो अमेरिकेत देखील शेफ म्हणून कार्यरत होता. मिहीर आता मायदेशी परतला आहे आणि नुकतेच त्याने स्वतःचा खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ameya Mhatre (@mhatre.ameya)

मिहिरने स्वतःचं हॉटेल सुरू केलं असून 'मharaj’ असं त्याच्या हॉटेलचं नाव आहे. नुकतीच १४ जुलै रोजी त्याच्या या व्यवसायाची सुरुवात झाली असून मराठी सेलिब्रिटींनी मिहिरला शुभेच्छा दिल्या आहेत. मिहीर पाठारे आणि त्याचा मित्र आदेश या दोघांनी ठाण्यात ‘मharaj’ ह्या नावाचा फूड ट्रक सूरु केला आहे. ह्या दोघांनी ग्राहकांच्या आवडी निवडी जाणून वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या राईस आणि पाव भाजीचा फूड ट्रक मध्ये समावेश केला आहे.

Recommended

Loading...
Share