By  
on  

'माहेरची साडी' फेम भाऊ - बहिण अलका कुबल आणि अजिंक्य देव यांची थेट लंडनमध्ये भेट

नव्वदच्या दशकात प्रचंड गाजलेला मराठी सिनेमा म्हणजे माहेरची साडी. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स बनवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले. अलका कुबल, रेणूका शहाणे, रमेश भाटकर, विक्रम गोखले, अजिंक्य देव, विजय चव्हाण, अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची आजही सगळ्यांच्या मनात क्रेझ आहे. या सिनेमातली अभिनेत्री अलका कुबल आणि अंजिक्य देव यांनी साकारलेली बहिण भावाची पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र या एका सिनेमानंतर अलका कुबल आणि अजिंक्य देव ही जोडी कोणत्या चित्रपटात दिसली नाही. मात्र अनेक वर्षांनी या जोडीची लंडनमध्ये भेट झाली आहे.

'बऱ्याच दिवसांनी लंडनमध्ये भेट', असं म्हणत अलका कुबल यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन अंजिक्य देव यांच्या सोबतचा एका फोटो शेअर केला आहे. दोघांना पाहून चाहत्यांना भलताच आनंद झाला आहे. अलका कुबल आणि अंजिक्य देव या ऑनस्क्रिन भाऊ बहिणींचा फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्स करत प्रेम व्यक्त केलं आहे. 

दरम्यान अभिनेत्री अलका कुबल या सध्या लंडनमध्ये congratulations या नव्या मराठी सिनेमाचं शुटींग करत आहेत. अभिनेता लोकेश गुप्ते सिनेमाचं दिग्दर्शक करत आहे. सिनेमात आतापर्यंत अलका कुबल यांच्यासह, सिद्धार्थ चांदेकर, पुजा सावंत हे कलाकार प्रमुख भूमिकेत असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र अलका ताईंनी शेअर केलेल्या फोटोनंतर अभिनेते अजिंक्य देव देखील सिनेमाचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive