By  
on  

"अशा वातावरणात शूटिंग करणे म्हणजे वेडेपणा आहे" ; अभिनेते अमोल कोल्हेंची 'ती' पोस्ट चर्चेत

अभिनेते अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या आगामी शिवप्रताप गरुडझेप या सिनेमाची सोशल मीडियावर घोषणा केली. खरंतर या सिनेमाची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. पण करोनामुळे शूटिंग सुरू होऊ शकलं नव्हतं. पण या कोरोनानंतर अमोल कोल्हे यांच्या 'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमाचं शूटिंग नुकतंच आग्र्याच्या लाल किल्ल्यात झालं. पहिल्यांदाच एका मराठी सिनेमाचं शूटिंग या किल्ल्यात झालं आहे. याच लाल किल्ल्यातल्या शूटिंगचा हा अनुभव अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर करत त्या व्हिडीओखाली कॅप्शन मध्ये लिहिलंय की, "अशा वातावरणात शूटिंग करणे म्हणजे वेडेपणा आहे, आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटिंग? कसं शक्य आहे? अनेकांच्या अनेक शंका.... पण प्रत्यक्ष इतिहास जणू ३५६ वर्षांनंतर त्या घटनेला कॅमेऱ्याच्या लेन्समधून पाहणार होता. ASI नियमावलीचे पालन करता करता होणारी दमछाक, त्यात ३८-४० डिग्री असलं तरी ७०% आर्द्रतेमुळे ४२-४४ वाटणारं तापमान. तेही सकाळी ९ वाजता. चुकून टाचणी विसरली तरी किल्ल्यातून बेस कँपपर्यंत पायपीट, ना बसायला खुर्ची ना पंखा.. सावलीसाठी आडोशाला उभं राहावं तर घामाच्या धारा आणि जरा हवेशीर ठिकाणी उभं राहावं तर उन्हाच्या झळा."

पुढे ते म्हणतात, "रोज ४-५ जण अंथरूण धरायचे नाही तर थेट हॉस्पिटल मध्ये. तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ' बचेंगे तो और भी लडेंगे' या ईर्षेने शूटिंग सुरू. ते पुढे लिहितात, 'पण यात खरं कौतुक करायला हवं ते आमच्या टीममधील सेटिंग बाॅइज, स्पाॅट बाॅइज,लाइट बाॅइज, काॅस्च्युम डिपार्टमेट, दिग्दर्शकांची टीम, कॅमेरा टीम आणि ज्युनियर आर्टिस्टचं.' कारण या सर्व प्रतिकूलतेत ते सर्वजण ठाम होते. महाराजांच्या पेहरावात मी जेव्हा लाल किल्ल्यात पाऊल ठेवलं तेव्हा भारावलेले, अगदी डोळे भरून तो प्रसंग डोळ्यात साठवणारे आणि 356 वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाच्या पुनर्प्रत्ययाचे ते सर्वजण पहिले साक्षीदार होते...'Strenght of a Chain is judged by the strength of weakest link in the chain' या उक्ती प्रमाणे टीमची ताकद दाखवून देत होते आणि आमचा टीम leader, आमचा दिग्दर्शक कार्तिक केंढे तर पहाडासारखा त्या प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय ठेवून उभा होता..''

यापुढे त्यांनी लिहिलंय की, "मला जाणवत होतं की आपापल्या परीने प्रत्येक मावळा लढत होता..आणि प्रत्येकाची प्रेरणा लाल किल्ल्याकडे स्वाभिमानी नजर रोखून ताठ मानेने उभी होती... शतकानुशकं अजरामर प्रेरणा - छत्रपती शिवाजी महाराज!'' कोल्हे यांची पूर्ण पोस्ट वाचल्यावर आपल्या शंकांना उत्तर मिळतंच,पण इतिहासाच्या साक्षीनं शूटिंगचे कष्टदायी अनुभव घेणं त्यानं कृतकृत्य होणं याचही एक वेगळाच आनंद असतो."

दरम्यान अमोल कोल्हे यांच्या या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांच्या शिवप्रताप गरुडझेप या नवीन सिनेमासाठी सर्वचजण उत्सुक आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive