By  
on  

मुक्ता बर्वेने घेतलेल्या नवीन घराला मधुगंधा कुलकर्णीचं नाव ; वाचा नेमकं प्रकरण काय आहे ते

मराठी सिनेसृष्टीतली गुणी आणि हरहुन्नरी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ता बर्वे ही मूळची पुण्यातली. कामाच्या निमित्ताने तिला मुंबई राहावे लागणार होते आणि यासाठी तिला घराची आवश्यकता होती. पण मुंबईत एकट्या मुलीला घर देण्यासाठी अनेक लोक आढेवेढे घेतात. तसेच आढेवेढे मुक्ताच्या बाबतीतही आले पण मुक्तासाठी धावून आली ती तिची मैत्रीण मधुगंधा कुलकर्णी. त्यावेळी मुक्ता मधूगंधा कुलकर्णीकडे भाडेकरू म्हणून राहत होती. पण मुक्ताने लवकरात लवकर घर घ्यावे अशी मधूगंधाची इच्छा होती.

आणि मग मधूगंधाने मुक्तासाठी घर शोधायला सुरुवात केली. यादरम्यान त्यांना एक घर पसंत पडलं आणि त्या घरासाठी त्यांनी एका महिला एजंटला अडीच लाख रुपयांचा चेक दिला, पण अचानक त्या महिलेने यांचे फोन उचलायचे बंद केले. यांच टेन्शन घेऊन मुक्ताला तापचं भरला. यावर मधूगंधाने लगेच मुक्ताला फोन करत तिच्या मनातली भीती काढून टाकली.

त्याच्यानंतर त्या एजंट बाईंचा अचानक फोन आला. त्यांनी त्यांचा काय प्रॉब्लेम झाला होता तो सांगितला. आणि मग मुक्ताची घर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मग काही दिवसांतच मुक्ताला  गोरेगावचे घर मिळाले आणि या सगळ्या प्रवासात मधुगंधा मुक्ताच्या पाठीशी खंबीर उभी होती. मधूगंधामुळेच मुंबईत मुक्ताचं स्वतःचं घर घेण्यापर्यंत प्रवास करू शकली आणि यामुळेच मुक्ताने तिच्या घराला ‘मधुकृपा’ हे नाव दिलंय.

मुक्ता बर्वे हिला तिची मैत्रीण मधुगंधा कुलकर्णी हिने दिलेली साथ अशीच कायम तिच्या घरासोबत आठवणीत राहावी म्हणून मुक्ताने आपल्या घराला मधुगंधाचे नाव दिले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive