By  
on  

"मी एकटीच का?" असा प्रश्न विचारत प्राजक्ता माळीने शेयर केली सोशल मीडिया पोस्ट

रानबाजार या वेबसिरीज नंतर प्रचंड चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिच्या वाय या सिनेमातील भूमिकेसाठी सुद्धा तिचं कौतुक करण्यात आलं. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर अनेक फोटोस् पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच प्राजक्ताने एक नवी पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

नुकतंच प्राजक्ता माळीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट प्रचंड पसंत केली जात आहे. ही पोस्ट शेअर करत तिने या पोस्टला 'मी एकटीच का?.... तुम्हीही आनंद घ्या'. असं कॅप्शन दिलं आहे. प्राजक्ताने ही अशी पोस्ट का केली, तर त्याचं असं आहे की, प्राजक्तानर तिच्यावर बनलेले मिम्स चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. 

प्राजक्ताच्या विविध फोटोसवर नेटकाऱ्यांकडून अनेक मिम्स बनवले जातात. यात प्राजक्ताच्या फोटोसवर सुद्धा अनेक मिमर्स मिम्स करून सोशल मीडियावर शेयर करत असतात आणि या मिम्सचा प्राजक्ता स्वतः तर आनंद घेतेच पण हे मिम्स ती सोशल मीडियावर पोस्ट करून तिचा आनंद चाहत्यांसोबत शेयर करते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive