By  
on  

मराठी स्वाभिमानाचा अंगार ; डॉ. अमोल कोल्हेंच्या 'शिवप्रताप गरुडझेपचा' टिझर पाहिलात का?

मराठी सिनेसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यात आता अमोल कोल्हे यांच्या शिवप्रताप गरुडझेप या सिनेमाची सुद्धा भर पडली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा टिझर चाहत्यांसोबत शेयर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

या टीझरमध्ये अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत असून या व्हिडिओला आवाज देखील त्यांचाचं आहे. या व्हिडीओत ते “३५६ वर्षांपूर्वी हाच आग्र्याचा लाल किल्ला थरारला होता. मुघलशाही हादरली होती. कारण याच वास्तूमध्ये पेटलं होतं मराठी स्वाभिमानाचं स्फुलिंग. पूर्ण हिंदुस्तानानं अनुभवला होता हा शिवप्रताप” हा संवाद म्हणत आहेत.

अमोल कोल्हे यांनी ‘शिवप्रताप- गरुडझेप’ चित्रपटाचा टीझर त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करताना त्यांनी लिहिलं, ‘शिवप्रताप- गरुडझेप… सप्टेंबर २०२२ ला चित्रपटगृहात…जय शिवराय! हर हर महादेव…’ असं म्हटलं आहे.

दरम्यान अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. येत्या सप्टेंबर २०२२ मध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार असून या सिनेमाची सर्वांनाचं उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive