हिंदीसह मराठी सिनेमांत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. रितेशने अनेक सेक्स कॉमेडी सिनेमांत अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अश्याप्रकाच्या सिनेमांत काम करण्याबाबत रितेशने त्याचं स्पष्ट मत मांडलं आहे.
नुकत्याच एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्याने काम केलेल्या 'मस्ती' , 'ग्रँड मस्ती' , 'क्या कुल है हम' , सारख्या अनेक सेक्स कॉमेडी सिनेमांत काम करण्याबाबत विधान केले की, मी अश्या अनेक सिनेमांत काम केले असून, ज्या ज्या भूमिका मला योग्य वाटल्या त्या मी साकारल्या. यात माझ्या कुटुंबीयांचा कुठेही कधीच हस्तक्षेप नव्हता."
रितेश हा एकमेव अभिनेता आहे ज्याने ४ ते ५ सेक्स कॉमेडी सिनेमे केले आणि त्याची त्याला अजिबात लाज वगैरे वाटत नसल्याचे रितेशने सांगितलं. हे सिनेमे बघून भविष्यात माझ्या मुलांना काय वाटेल याचा विचार मी कधीच केला नाही. माझे वडील त्यावेळी मुख्यमंत्री असताना देखील मी हे सिनेमे त्यावेळी केले. कोणत्या सिनेमांत काम करावं ही माझी पसंती होती. माझ्या आईवडिलांनी मला हे कर किंवा हे करू नको असं कधीच सांगितलं नाही. माझ्या आवडीचं काम त्यांनी मला करू दिलं" असं रितेश यावेळी म्हणाला.
त्याचबरोबर माझ्या मुलांना स्टारडम, पापाराझी वगैरे बाबत काहीच माहीत नाही. अनेक लोकं माझ्यासोबत फोटो का काढतात याबद्दलही त्यांना काहीच ठाऊक नाही. माझी मुलं शाळेत जातात तेव्हा त्यांना त्यांचे मित्र सांगतात की तुझे वाडीक स्टार आहेत. पण यावेळी रितेश मुलांना मी त्यांच्यासाठी आणि कुटुंबासाठी रोज कामावर जातो असं त्याच्या मुलांना सांगतो.
त्यामुळे रितेश देशमुख हा बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीत टॉपचा कलाकार असूनदेखील तो अजून जमीनीवर असल्याचं त्याच्या वर्तनावरून दिसून येतं.