By  
on  

'टाईमपास-३' च्या प्रीमियरला हृताच्या सासूबाईंनी लावली हजेरी ; हृताच्या अभिनयावर सासूबाई खुश

अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता प्रथमेश परब यांचा टाईमपास ३ सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या प्रदर्शित झाला असून या सिनेमाचा प्रीमियर शो नुकताच पार पडला. या प्रीमियरला हृताच्या नवऱ्याने आणि सासूबाईंनी खास हजेरी लावली.

'टाइमपास ३' चे काही फोटोस समोर आलं असून या फोटोज मध्ये हृता आणि तिची सासू मस्त स्टायलिश अंदाजात दिसत आहेत. मुग्धा आणि हृता यांच्यातील छान बॉण्डिंग पाहायला मिळाले. सासू सुनेपेक्षा त्यांच्यात मैत्रीचं नातं पाहायला मिळाल. सासू सुनेची हटके जोडी एकत्र पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला. हृताच्या चाहत्यांनाही सासू सुनेची ही जोडी खूप भावली आहे. 

दरम्यान हृताचा पहिला वहिला अनन्या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असताना हृताचा आणखी एक सिनेमा रिलीज झाल्याने हृताचे चाहते खुपच उत्सुक आहेत

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive