By  
on  

चिमुकल्या परीचं लाडक्या बाप्पासोबत खास फोटोशूट

माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात. 

 

 

वर्षभर आपण बाप्पाच्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहतो. तो बाप्पाचा गणेशोत्सव लवकरच सुरु होतोय. यानिमित्ताने परीने बाप्पासोबत एक खास फोटोशूट केलं आहे. 

 

मायराने नऊवारी साडी, नाकात नथ, डोक्यावर फेटा आणि हातात बाप्पाची मूर्ती असं गोड फोटोशूट केलं आहे.

परीसुध्दा बाप्पाच्या आगमनासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं या फोटोशूटवरुन पाहायला मिळतंय. 

मायाराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive