By  
on  

"बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीचं दर्शन घ्या कारण." ; पावनखिंड फेम अजय पुरकरांचं शिवप्रेमींनी आवाहन

मराठीमध्ये आता ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या पावनखिंड या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि या चित्रपटातील बाजीप्रभू देशपांडे यांनी भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे अजय पूरकर. बाजीप्रभूंच्या भूमिकेमुळे अजय यांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. इतिहासप्रेमी अजय यांनी नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Purkar (@ajay.purkar)

अजय पुरकर हे त्यांच्या लेकीसह विशाळगडाच्या दर्शनासाठी गेले असताना तिथून त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना एक आवाहन देखील केलं आहे. या व्हिडिओत ते म्हणतात, “मी आणि माझी मुलगी सई विशाळगडाच्या दर्शनाला आलो आहोत. आता आम्ही नरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीजवळ आहोत. यानिमित्ताने पावनखिंडीचंही दर्शन घडलं. महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आज प्रकर्षाने जाणीव होतेय तसेच आठवण येत आहे. ते आज आपल्यामध्ये असते तर १०१ वर्षांचे असते. बाबासाहेब पुरंदरे यांनी नाटकामधून आमच्या रक्ताच्या धमन्यातून छत्रपती शिवाजी महाराज पसरवले. ते नाटक म्हणजे ‘जाणता राजा’. हे नाटक तोंड पाठ झालं होतं. तेव्हापासूनच मला शिवचरित्राची ओढ लागून राहिली होती. आज बाबासाहेबांचं कार्य मागे वळून पाहताना असं वाटतं की त्यांच्या हातून किती महान कार्य घडलेलं आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशामध्ये देखील ‘जाणता राजा’चे असंख्य प्रयोग झाले. त्यामुळेच जगभरात पसरल्या गेलेल्या मराठी माणसांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कायमचे कोरले गेले.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Purkar (@ajay.purkar)

यापुढे त्यांनी अनेक शिवप्रेमींना आवाहन करत म्हटले आहे की, "आज एक आवाहन मला शिवभक्तांना आणि सर्व मराठी मनाच्या माणसांना करायचं आहे. ते आवाहन म्हणजे आपण असंख्य लोक दरवर्षी किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा पावनखिंडीचं दर्शन घेता. यादरम्यान इथे बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांची समाधी आहे. त्याचंही दर्शन आवश्य घ्या. या वीररत्नांचं दर्शन घेऊन तुम्हाला अधिक समाधान वाटेल. हेच आवाहन तुम्हा सगळ्यांना मी करत आहे. नक्की याचा विचार करा. पावनखिंडीचं दर्शन तसेच विशाळगडाचंही दर्शन आपल्याला घ्यायचं आहे हे लवकरात लवकर ठरवा. हरहर महादेव." असं त्यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive