By  
on  

'झलक दिखला जा’च्या १० व्या सिजनमध्ये अवतरणार चंद्रमुखी ; अभिनेत्री शिल्पा शिंदेदेखील होणार सहभागी

कलर्स मराठी वरील 'झलक दिखला जा' हा डान्स रियालिटी शो तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सेलिब्रिटींचा सहभाग असलेल्या या नृत्यावर आधारित रिअ‍ॅलिटी शोच्या दहाव्या पर्वाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. इतक्या काळानंतर परतणाऱ्या या शोमध्ये सेलिब्रिटी स्पर्धक कोण असतील?, याची उत्सुकता असताना शोच्या निर्मात्यांनी दोन मराठमोळय़ा अभिनेत्रींची नावं जाहीर केली आहेत. 'झलक दिखला जा'च्या दहाव्या सिजनमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेत्री शिल्पा शिंदे यांचा सहभाग निश्चित झाला आहे.

नुकत्याच आलेल्या 'चंद्रमुखी' या सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकरने चंद्राची भूमिका साकारली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयासोबतचं डान्सचं देखील भरभरून कौतुक झालं. 
अमृता स्वतः एक अतिशय उत्तम अभिनेत्री तर आहेच. त्यासोबत ती एक उत्तम डान्सर देखील आहे. पती हिमांशुसोबत अमृताने 'नच बलिये'चा ७ वा सीजन जिंकला होता. यानंतर अमृता विविध भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली. यानंतर आता कलर्स हिंदी वरील ‘झलक दिखला जा’ या शो मध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

तर ‘बिग बॉस’ची विजेती ठरल्यानंतर पुन्हा काही काळ दूरचित्रवाणी मालिका-शोजपासून दूर असलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे या शोच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. दरम्यान कलर्स वाहिनीवर येण्यासाठी सज्ज झालेल्या या शोसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि निर्माता करण जोहर हे परीक्षकाच्या भूमिकेत असणार आहे. तर अभिनेत्री नोरा फतेहीसुद्धा शोची परीक्षक म्हणून दिसणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive