By  
on  

'टाईमपास ३ मधली ते दृश्य तातडीने काढून टाका अन्यथा...' ; मराठी एकीकरण समितीची फेसबुक पोस्ट व्हायरल

नुकताच टाईमपास ३ हा सिनेमा रिलीज झाला असून टाईमपास ३ मधून दगडू-पालवीची अनोखी लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट टाइमपास ३ या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मात्र नुकतंच या सिनेमातील एका दृश्यावर आक्षेप नोंदवला जात आहे.

मराठी एकीकरण समितीने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी टाइमपास ३ या चित्रपटाबद्दल संताप व्यक्त करत म्हटले आहे की , “रवी जाधव…, तुमच्या चित्रपटात #हिंदी #राष्ट्रभाषा अशी खोटी माहिती दाखवली आहे. राष्ट्रभाषा असण्याचे पुरावे द्या अन्यथा माफी मागा. अफवा पसरवणे गुन्हा असून तो आपण करत आहात, चित्रपटातील ते दृश्य तातडीने काढून टाकावे. आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल ही अपेक्षा”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मराठी एकीकरण समितीच्या त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान सगळीकडे टाईमपास ३ ची जोरदार चर्चा सुरू असून प्रेक्षक या सिनेमाचं भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive