By  
on  

मराठमोळ्या अमृता सुभाषचा बॉलिवूड नंतर हॉलिवूडमध्ये डंका ; लॉस एंजलिसमध्ये होणार 'मासा'चं स्क्रिनिंग

नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांनी मोहर उमटवली. यानंतर आता मराठी मनोरंजन सृष्टीतून आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अभिनेत्री अमृता सुभाष हिचा 'मासा' हा लघुपट परदेश वारीला जाणार आहे. 'मासा' लघुपटाचं कॅलिफोर्नियामधील लॉस एंजलिसमध्ये स्क्रिनींग होणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PHULAWA (@phulawa)

Hollywood International Diversity Film Festival मध्ये 'मासा' या शॉर्ट फिल्मची निवड झाली असून येत्या १३ ऑगस्टला 'मासा'चं स्क्रिनिंग होणार आहे. दिग्दर्शिका फुलवा खामकर हिनं तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या फिल्म फेस्टिव्हलची माहिती दिली आहे. फुलवानं शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे. 

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरनं मासा लघुपटाचं दिग्दर्शन केलं असून यात अभिनेत्री अमृता सुभाषनं प्रमुख भूमिका साकारली असून ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांची देखील या लघुपटात महत्वपूर्ण भूमिका आहे. तर प्रज्ञा दुगल, तेज दुगल आणि फुलवा खामकर, अमर खामकर यांच्या पी.एस.डी.जी स्टुडिओज या प्रोडक्शन हाऊसनं या लघुपटाची निर्मिती केली आहे. संदेश कुलकर्णी यांनी या लघुपटाचं कथानक लिहिलं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive