By  
on  

वयाच्या पंच्याहत्तरीतही अभिनेत्री ज्योती सुभाष यांचा इतरांना लाजवेल असा उत्साह ; पाहा हा व्हिडीओ

मराठीसह हिंदीत आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अमृता सुभाषने अनेक वेबसिरीजमधून उत्तम भूमिका केल्याने तिचा चाहतावर्ग मोठा आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या अमृताला अभिनयाचा हा वारसा तिच्या आईकडून अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्याकडून मिळाला आहे.

ज्योती सुभाष यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृताने एक खास एक व्हिडिओ शेयर करत आईचे आभार मानले आहेत. अमृताने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेयर करत कॅप्शन मध्ये लिहिलंय, "आई काल ७५ वर्षांची झाली. तिनं मला आयुष्यात ज्या लाखमोलाच्या भेटी दिल्यात त्या सगळ्या या व्हीडीओत दिसतात. सुंदर गाणं, नाच, अभिनय आणि अचूकतेची आस.. आपल्या कलेतून आयुष्यावर भरभरुन प्रेम करणं.. मी ऋणी आहे. आई तू एक आनंदाचा धबधबा आहेस! खूप प्रेम" 

दरम्यान या व्हिडीओमध्ये ज्योती सुभाष या एक डान्स स्टेप शिकवताना दिसत आहेत आणि त्यांचा हा उत्साह इतरांना लाजवण्यासारखा आहे. या व्हिडीओवर मराठीतील अनेक कलाकारांसह चाहत्यांनी देखील कमेंट्स करत या व्हिडीओला लाईक्स दिले आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive