By  
on  

मराठमोळी क्षिती जोग झळकणार बॉलिवूडमध्ये ; रणवीर सिंगच्या 'रॉकी और राणी की प्रेमकहाणी' मध्ये साकारणार भूमिका

मराठी नाटक, मालिका आणि सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे क्षिती जोग.  सध्या बॉलिवूड मध्ये अनेक मराठी कलाकार हिंदी सिनेमांत अनेक महत्वाच्या भूमिका करताना दिसून येतात. रणवीर सिंगच्या नुकत्याच जाहीर झालेल्या एक सिनेमात मराठमोळं नाव झळकणार आहे. हे मराठमोळं नाव म्हणजे क्षिती जोग. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by kshitee jog (@kshiteejog)

क्षिती जोग येत्या काळात धर्मा प्रॉडक्शनच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं शूट नुकतंच संपलं असून एक जंगी wrap party आयोजित करण्यात आली होती. या पार्टीचा एक व्हिडिओ स्वतः रणवीरने सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामध्ये रणवीर क्षितीला जोरदार मिठी मारताना दिसत आहे. क्षितीने सुद्धा शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरी टाकून शेअर केले होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by kshitee jog (@kshiteejog)

क्षितीने नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांतून स्वतःला सिद्ध केलं आहे. झिम्मा मधील सात अभिनेत्रींमध्ये क्षितीने तिच्या अभिनयाची छाप पाडली. तिचं या भूमिकेमुळे खुप कौतुक झाले. दरम्यान रणवीरच्या 'रॉकी और राणी की प्रेमकहाणी'च्या निमित्ताने सगळ्याच मराठी कलाकारांना आनंदाची बातमी मिळाली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive