By  
on  

'नागपंचमी' निमित्त मालिकेच्या टीमनं केलं अभिनेत्री अभिज्ञा भावेचं बर्थडे सेलिब्रेशन ; पाहा हा व्हिडीओ

झी मराठी वरील तू तेव्हा तशी मालिका लोकप्रिय होत आहे. त्याचबरोबर मालिकेतील कलाकार देखील प्रेक्षकांना आवडत आहेत. मालिकेतील सौरभ-अनामिका सोबतंच वल्ली देखील प्रेक्षकांना आवडतेय. मात्र नागपंचमी निमित्त मालिकेतील कलाकार आणि इतर टीमने सेटवर अभिज्ञाचा खोटा वाढदिवस साजरा केला.

झी मराठीने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये एक जण अभिज्ञाचे डोळे झाकत तिला एक सरप्राईज देताना दिसत आहे. तिच्यासाठी खास केक आणला असून त्यावर ‘हॅपी बर्थडे नागीण’ असं लिहिलं आहे आणि अभिज्ञाला सरप्राईज देत कलाकार तिच्यासाठी बर्थडेचं गाणं गाताना दिसत आहेत. हे सगळं नागपंचमीच्या निमित्ताने केल्याचं समोर आलं आहे. मालिकेतील वल्ली ही नाजूक वेळ नाहीतर डसणारी नागीण आहे, अशी तिची ओळख करून देते, त्यामुळे त्या तेव्हा तशीच्या टीमने नागपंचमीचा दिवस साधून तिचा फेक वाढदिवस साजरा केला. 

दरम्यान या संपूर्ण व्हिडिओ मध्ये अभिज्ञा सुद्धा या सगळ्याची मजा घेताना दिसत आहे. तिने या व्हिडिओत मालिकेतील तिचा फेमस डायलॉग सुद्धा म्हटलं आहे. त्याचबरोबर चाहत्यांनी देखील या व्हिडिओखाली कमेंट्स मध्ये आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive