By  
on  

भरजरी साडी अन् केसांत गजरा ; पाहा रिंकू राजगुरूचा राजेशाही थाट

'सैराट'मुळे घराघरांत पोचलेली अभिनेत्री सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू.

पहिल्याच चित्रपटात हिट ठरल्यानंतर रिंकूला अनेक सिनेमांची ऑफर मिळत आहे आणि तिची लोकप्रियताही वाढत आहे.

नुकतंच रिंकूनं एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोतील नव्या लुकमध्ये तिचा राजेशाही थाट दिसत आहे.

या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाव्ही भरजरी साडी परिधान केली असून केसात गजरा देखील माळला आहे. 

'उदासियों की इतनी तलब अच्छी नहीं है, मुस्कुराए जनाब ये ज़िंदगी आपकी ही है..', असं कॅप्शन रिंकूनं दिलं आहे.

या साडीमध्ये रिंकू प्रचंड सुंदर दिसत असून चाहत्यांना देखील अर्चीचा हा लूक प्रचंड आवडला आहे.

रिंकूच्या या फोटोजवर चाहते देखील सैराट होऊन लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive