By  
on  

"मी कर भरते, मतदान करते, त्यामुळे मलाही बोलण्याचा अधिकार" म्हणत हेमांगी कवीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या नानंत घर केलं आहे. अभिनेत्री हेमांगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच तिची मतं व्यक्त करत असते. मात्र यामुळे अनकेदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकतंच हेमांगीने एका मुलाखतीत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे

नुकतंच एका मुलाखतीत हेमांगी ट्रॉलर्स बद्दल विचारण्यात आले असता तिने सांगितले की, "आधी मी या गोष्टींना खूप सिरियसली घ्यायचे, पण आता या गोष्टींना फार महत्व देत नाही किंवा ट्रॉलर्सच्या भीतीने माझं अकाउंट किंवा पोस्ट देखील कधी डिलीट केलेल्या नाहीत. याउलट माझ्या या पोस्ट ट्रॉलर्समुळे चर्चेत आल्या आहेत." असंही ती म्हणाली.

हेमांगी पुढे असं म्हणाली की, "आपण जसे कलाकार आहोत, तसे नागरिकही आहोत हा विचार मी करते. मी कर भरते, मतदान करते, त्यामुळे मलाही बोलण्याचा अधिकार आहे. आपत्ती आल्या की कलाकारांनी मदत करण्याची अपेक्षा केली जाते. त्यावेळी त्यांची सामाजिक बांधिलकी काढली जाते. मग इतरवेळीही आम्ही जागं असणं गरजेचं आहे ना? मी आधी माणूस मग कलाकार आहे, त्यामुळे व्यक्त होणं हा माझा अधिकार आहे”, असेही हेमांगी कवी म्हणाली.

दरम्यान कलर्स मराठी वरील लेक माझी दुर्गा मालिकेतुन नुकतंच हेमांगीने एक्सिट घेतली. यानंतर आता तिचा आगामी प्रोजेक्ट 'तिचं शहर होणं' लवकरच भेटीला येणार आहे. त्याचबरोबर एका वेबसिरीजमध्ये सुद्धा ती लवकरच दिसणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive