'बॉईज-३' मधील लग्नाळू २.० गाण्यावर टीकेची झोड ; जाणून घ्या सविस्तर

By  
on  

बॉईज या गाजलेल्या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची अर्थात बॉईज-३ ची घोषणा झाल्यापासून या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नुकतंच यातील लग्नाळू २.० हे गाणं रिलीज झालं हे गाणं देखील जोरदार वायरल होतंय. मात्र त्याचबरोबर गाण्यावर टिका देखील होत आहे.

बॉईज मधील लग्नाळू या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला होता. या गाण्यानंतर लग्नाळू २.० लग्नाळू हे गाणं रिलीज झालं आहे, पण बॉईज मधील लग्नाळू गाण्याची सर या नव्या गाण्याला नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. हे एक आयटम सॉंग असून त्यामध्ये देवीचं नाव घेतल्याबद्दल अनेकांनी गाण्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तसंच यामध्ये विदुला चौघुले ही अभिनेत्री थिरकताना दिसली आहे.

आयटम सॉंग मध्ये देवीचं नाव का घेतलं आहे म्हणत अनेकांनी गाण्यावर टीका केली आहे. "अशी गाणी बंद करा. आपणच आपल्या संस्कृतीची वाट लावतो.” अश्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र काहींनी विदुलाच्या या यशस्वी प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. अनेकांना लग्नाळूच्या पहिल्या भागाला हा दिलेलं हे प्रतिउत्तर आवडलं आहे. अनेकांच्या मते आपणच आपल्या मराठी इंडस्ट्रीला पुढे नेलं पाहिजे. गाणं आवडलं नसेल तर त्यावर नेगेटिव्ह बोलणं टाळावं अशी प्रतिक्रिया अनेकांनी कमेंटमध्ये दिली आहे.

Recommended

Loading...
Share