स्वतःच्या दुबईच्या हॉटेलमध्ये आशा भोसलेंनी बनवली बिर्याणी ; व्हिडीओ वायरल

By  
on  

आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका म्हणणे आशा भोसले. आशा भोसले यांनी त्यांच्या मधुर आवाजाचा खूपच मोठा चाहतावर्ग आहे. अगदी परदेशात सुद्धा. आशा भोसले या सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतात. गायिका आशा भोसले यांचा दुबईमधील एक व्हिडिओ समोर आला असून यात त्या स्वयंपाकघरात काम करताना दिसत आहेत. आशा भोसले यांची नात जनाईने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zanai (@zanaibhosle)

आशा भोसले या गाण्याव्यतिरिक्त स्वयंपाक करण्यातही पारंगत आहेत. त्यांची दुबई, कुवेत, अबू धाबी, दोहा, बहरेन यांसारख्या अनेक ठिकाणी हॉटेल आहेत. “आशाज” असे त्यांच्या दुबईतील हॉटेलचे नाव आहे. आशा भोसले यांच्या नातीने त्यांच्या दुबईतील ‘wafi’ या मॉलमधील “आशाज” हॉटेलमधील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला जनाई ही त्या हॉटेलची झलक दाखवताना दिसत आहे. यात आशा भोसले या स्वंयपाकघरात चक्क शेफचे कपडे परिधान करुन खमंग दम बिर्याणी बनवताना दिसतायत. ही बिर्याणी तयार झाल्यानंतर त्या छान ती सर्व्ह करतानाही दिसत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle)

दरम्यान या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला आशा भोसलेंचचं ‘आओ ना, गले लगालो ना’ हे गाणे वाजताना दिसत आहेत. त्यासोबतच त्यांनी या व्हीडीओला ‘दुबई येथील आशाज रेस्टॉरंटमध्ये मला येऊन भेटा’ असेही म्हटले आहे. दरम्यान या व्हीडीओखाली चाहत्यांच्या अनेक कमेंट्स येत असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.

Recommended

Loading...
Share