By  
on  

'झलक दिखला जा १०'च्या मंचावर धकधक गर्ल माधुरी सोबत थिरकणार मराठमोळी 'चंद्रमुखी' ; पाहा व्हिडिओ

मराठीतली चंद्रमुखी अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर ही एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण रक उत्तम डान्सर सुद्धा आहे. हे सगळेच जाणतात. नुकतंच तिने चंद्रमुखी या सिनेमात तिच्या नृत्याची जादू सगळयांना दाखवली आहे. यानंतर ती आता 'झलक दिखला जा सिझन 10' मध्ये आपले नृत्याची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. छोटया पडद्यावरील लोकप्रिय डान्स रियालिटी शो 'झलक दिखला जा सिझन 10' चा एक प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार येत्या सप्टेंबर मध्ये सुरु होणाऱ्या या शो मध्ये अमृता सहभागी होणार हे आता कन्फर्म झालं आहे. अमृताने आतापर्यंत तिच्या नृत्याने मराठी प्रेक्षकांना तर भुरळ घातलीच आहे पण आता ती हिंदीमध्ये नाव कमावण्यास सज्ज झाली आहे. आता ही झलक दिखला जा या शो मध्येही आपल्या नृत्याचा ठसा उमटवणार आहे.

'झलक दिखला जा सिझन 10' चा एक प्रोमो समोर आला असून यात चंद्रमुखी अमृता खानविलकर धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत थिरकताना दिसत आहे. या दोघीही मराठमोळ्या अभिनेत्री आता हा शो गाजवणार हे नक्की. त्यामुळे आता हा शो बघण्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

कलर्स टीव्हीने कलर्स वाहिनीने सोशल मीडियावर शेयर केलेल्या या प्रोमोखाली अमृताने देखील कमेंट करत उत्सुकता दाखवली आहे. तिने या कमेंट मध्ये असं म्हटलंय की, 'ज्या अभिनेत्रीमुळे अभिनेत्री बनावं असं वाटायला लागलं ज्यांचं रूप ... सौंदर्य ... नृत्य अविस्मरणीय होतं .. आहे आणि राहणार अश्या माझ्या अतिशय लाडक्या अभिनेत्री बरोबर मला थिरकायला मिळालं. तुमची हि चंद्रा तिच्या चंद्रमुखी समोर नृत्य प्रदर्शन करायला सज्ज आहे मध्ये... नेहमी प्रमाणे तुमची साथ असुद्या' अशा शब्दांत अमृताने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान 'झलक दिखला जा'च्या या 10 व्या सिजनमध्ये कोण कोणते कलाकार सहभागी होणार आहेत हे अजून गुलदस्त्यात आहे. त्याचबरोबर अमृता खानविलकर ही यात स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे की परीक्षक म्हणून हे देखील अजून गुलदस्त्यात आहे. पण 'चंद्रमुखी' अमृता खानविलकर 'झलक दिखला जा सिझन 10'चा भाग असणार हे नक्की झालं आहे, तर प्रसिद्ध अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दीक्षित या शोची जज असणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive