By  
on  

'अंगठी विसरल्यानं कुणालचा सोनालीला प्रपोज करण्याचा प्लान फसला होता...' ; अभिनेत्रीनेचं शेयर केला खास किस्सा

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या होऊन गेलेल्या लग्नाची गेले काही दिवस सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. सोनाली -कुणालचा लग्नसमारंभ अगदी मोजक्याच लोकांमध्ये पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते. त्यामुळे सोनालीचे लग्न कसे झाले, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती आणि म्हणूनच चाहत्यांची ही इच्छा ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीने पूर्ण केली आहे.

यातील एका व्हिडीओमध्ये सोनालीने कुनालच्या फसलेल्या प्रपोजचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. या व्हिडिओत सोनाली म्हणते, “माझी आणि कुणालची भेट २०१७ मध्ये काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून झाली. आम्ही ऑनलाइन पहिल्यांदा भेटलो होतो. चॅटवर बोलणं झालं होतं. एकमेकांबद्दल जाणून घ्यायला सुरुवात झाली, मग मैत्री झाली. पहिल्यांदा लंडनमध्ये भेटलो. मी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले होते. मग तो दुबईमध्ये शिफ्ट झाला आणि आमच्या भेटी वाढल्या.” 

दरम्यान २ वर्षांनंतर सोनालीने कुणाल अक्षरशः धनकी देत सांगितले होते की जर तू आता या भेटीनंतर काही ऑफिशियल केलं नाहीस तर माझ्या घरचे तुला भेटायला पाठवणार नाहीत. त्यानंतर सोनाली कुणालच्या शेवटच्या भेटीवेळी  कुणाल सोनालीला दुबईच्या सगळ्यात उंचीवरच्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्यांनी एक झीप लाइन रोलर कोस्टर राइड केली. यावेळी सोनालीला वाटलं की कुणाल आता तिला प्रपोज करेल, पण कुणालने काही तिला प्रपोज केलं नाही.

पुढे कुणालच्या प्रपोजबद्दल सांगताना सोनाली म्हणते, “दुसऱ्या दिवशी माझी फ्लाइट होती. सकाळी मी त्याच्याकडे रुक्ष नजरेनं पाहिलं आणि त्याला मला एअरपोर्टला सोडायला सांगितलं. मी लिफ्टपाशी उभी होते. अचानक कुणालने मला आतून हाक मारली आणि तू काही विसरत तर नाहीयेस ना? असं म्हणत ओव्हरएक्टींग करून त्याने मला पुन्हा आता बोलावलं आणि माझ्या आवडीचं गाणं लावलं. त्याने मला त्यावेळी तिथेच प्रपोज केलं. यावर माझं म्हणणं असं होतं की तू हे काल का नाही केलं. त्यावर तो मला म्हणला की मी कालच तुला प्रपोज करणार होतो पण मी त्यावेळी अंगठी विसरलो होतो.” आणि अशाप्रकारे कुणालचा सूर्यास्ताच्या वेळी सोनालीला रोमँटिक प्रपोज करण्याचा प्लान फसला होता.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive