By  
on  

'रज्जो' या हिंदी मालिकेत अभिनेत्री आयुषी टिळकची महत्वपूर्ण भूमिका

मराठी अभिनेत्री सुयश टिळक ही एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतचं एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. नुकताच आलेल्या 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटात ती झळकली होती. मैत्रीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या 'रूपनगर के चिते' या आगामी चित्रपटात ती महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

आयुषीचा दुसरा चित्रपट रिलीज होण्याअगोदर तिने हिंदी मालिका सृष्टीत पदार्पण केलं आहे. येत्या २२ ऑगस्ट पासून स्टार प्लस या हिंदी वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता ‘रज्जो’ ही नवी मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेत आयुषी रज्जोची प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. रज्जो ही गरिबीत वाढलेली मुलगी, आपली आई नदीतून जे काही मिळवेल त्यावर त्यांचे पोट भरते. तर रज्जो देखील आर्थिक हातभार लागावा म्हणून वस्तू विकते. इथेच तिची भेट श्रीमंत घरच्या अर्जुनशी होते. गरिबी आणि श्रीमंतीची दरी रज्जो कशी कमी करते याची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अभिनेता राजविर सिंग हा आयुषी सोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. दिग्दर्शिका, निर्माती मुक्ता धोंड यांनी मालिकेची धुरा सांभाळली आहे. रज्जो मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला असून या नव्या मालिकेचे काही व्हिडिओज आयुषीने तिच्या सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive