By  
on  

'त्यांनी केलेल्या कृतीचे किंवा विचारांचे मी समर्थन करत नाही' ; 'लाल सिंग चढ्ढा'च्या पोस्टवर राहुल देशपांडेंचं स्पष्टीकरण

राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांचे कार्यक्रमाबद्दलचे अपडेट्स पोस्ट करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांचादेखील चांगलाच प्रतिसाद मिळतो. पण नुकत्याच त्यांनी केलेल्या लाल सिंग चढ्ढा चित्रपटाबद्दलच्या एका पोस्टमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या ट्रोलिंगवर राहुल देशपांडे यांनीदेखील सडेतोड उत्तर दिलं आहे.

राहुल देशपांडे यांनी लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली. हा चित्रपट पाहिल्यावर त्यांनी एक वक्तव्य केले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आणि यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या. त्या कमेंट्स पाहून त्यांनी काही वेळाने आणखी एक पोस्ट शेअर करत यावर स्पष्टीकरण दिले आहे.

या पोस्ट मध्ये राहुल देशपांडे म्हणतात, “नमस्कार रसिक मित्रहो !! लाल सिंग चढ्ढा ह्या चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळेस मी व्यक्त केलेल्या विधानातून पूर्णतः अनपेक्षित संदेश जातोय, असं मला वाटतंय. त्या प्रिमीयरसाठी एक निमंत्रित कलाकार म्हणून, मी त्या चित्रपटासाठी परिश्रम घेतलेल्या पडद्यावरील व पडद्यामागील सर्वांविषयी सद्भावना व्यक्त केल्या. ह्याचा अर्थ चित्रपटातील कलाकारांनी ह्यापूर्वी केलेल्या कुठल्याही कृतीचे वा त्यांनी मांडलेल्या विचारांचे मी समर्थन करतो असे मुळीच नाही.” ढे त्यांनी म्हटलंय की, “आपणां सर्वांइतकीच भारतीयत्वाची भावना माझ्या मनांतही प्रबळ आहे व मला त्याचा सार्थ अभिमान आहे. म्हणूनच माझ्या विधानाचा विपर्यास करून घेऊ नये, अशी आपणां सर्वांकडे नम्र विनंती ! लोभ आहेच. वृद्धिंगत व्हावा!!” असे त्यांनी यात म्हटले आहे.

दरम्यान त्यांच्या या पोस्टखाली राहुल देशपांडे यांच्या अनेक चाहत्यांनी राहुल यांना पाठिंबा दर्शवत 'प्रत्येकाला त्याचं त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे', 'कुणी काय बोलावं-लिहावं या ज्याचा त्याचा प्रश्न आहे', 'तुम्ही ट्रॉलर्सकडे जास्त लक्ष देऊ नका' अश्या आशयाच्या अनेक कमेंट्स केल्या आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive